भोज्जा

रविवार, १७ ऑक्टोबर, २०१०

विजया दशमी

दसरा सण मोठा ,
नाही आनंदाला तोटा!

विजयादशमीच्या  सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

रविवार, १० ऑक्टोबर, २०१०

श्री सप्तशृंगी माता प्रसन्न

नासिक 
श्री कुल दैवताय नमः!

बिग बॉसचा खेळ बंद. म्हणजे माझ्या कडून.

मित्रांनो वाटल नव्हत कि हि वेळ इतक्या लवकर येईल म्हणून.पण नाईलाज झाला.शेवटी आपल्या वेळेला सुध्धा काही किंमत आहे कि नाही?संयुक्तिक कारणे खालील प्रमाणे.

१) खेळाडूंच्या चुकीच्या निवडी मुळे खेळातील गम्मत सुरुवाती पासूनच हरवलेली.
२) बोजड चेहऱ्याच्या लोकांचे चाळे बघण्यात काहीच स्वारस्य नसते.
३) जवळपास प्रत्येक जण स्वतःच्या केलेल्या चुकांची सारवासारव करण्यासाठी आणि त्याहून महत्वाचे म्हणजे कफल्लक अवस्थेतून बाहेर पडण्याच्या धडपडी मुळे येथे येऊन धडपडल्याचे त्यांच्या बोलण्यातूनच समजले.नमुन्या दाखल खालील उदाहरणे घेऊ.
४) वीणा मलिक ... जो काही थोडा फार पैसा तरुणपणी मिळवला होता तो अक्कल मातीत गेल्याने व्यसनी असिफ वर उधळल्याने हिला स्वतःला येथे उधळावे लागले.
श्वेता तिवारी .... राजा चौधरीची हिने केलेली निवड चुकल्याचे हिला मुल झाल्यावर लक्षात आले.आता वेळ निघून गेली त्या मुळे मुलीचे नि स्वतःचे पोट निस्तर्याण्याची जबाबदारी इलाज असो व नसो सांभाळणे भाग पडतेय.वेळ प्रसंगी ह्याच पद्धतीच्या दुसर्या शो मध्ये केले तसे उघडे नागडे अंग प्रदर्शन करावे लागले तरी हरकत नसलेली.
पटेल ....... MMS कांडा मुळे फिल्मी करिअर तर बरबाद झाले आहेच पण रडून भागून काही कामे मिळाली तर एक शेवटचा प्रयत्न म्हणून आलाय.कारण बहिण तर सिनेमा क्षेत्रातून कधीच हद्दपार झालीये.

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

बिग बॉसचा खेळ सुरु

काल पासून बिग बॉसचा खेळ पुन्हा सुरु झाला.ह्या वेळी फक्त टेस्ट व्हेन्यू बदलला म्हणजे सोनीच्या ऐवजी कलर.ह्या वेळचे खेळाडू पाहता खेळ रंगण्या साठी ज्या आवश्यक गोष्टी लागतात त्याची निदान आत्ता तरी खूपच कमतरता वाटते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे खेळाडूंचे सरासरी वय.खरे तर टी आर पी वाढविण्यासाठी ते सरासरी २५ ते २७ -२८ असणे एवढेच गरजेचे आहे.ह्याचा फायदा म्हणजे एक तर आयुष्याचा त्या तुलनेत कमी असलेला अनुभव,सळाळते रक्त,तारुण्य सुलभ भावना,थोड्या सहवास नंतर सुध्धा एकमेका बद्दल वाटू शकणारे आकर्षण,बेडरपणा,तापटपणा क्वचित प्रसंगी अपरिपक्वपणा ह्या सगळ्या खरे तर हा खेळ रंगण्यास कारणी भूत ठरणाऱ्या गोष्टी आहे.

रविवार, ३ ऑक्टोबर, २०१०

बापू

काल गांधी जयंती सर्वत्र नेहमीच्या उत्साहात साजरी झाली.रात्री टी.व्ही.ऑन केल्यावर सालाबाद प्रमाणे वेगवेगळ्या नेत्यांचे,पुढार्यांचे हस्ते वेगवेगळ्या शहरात,गावात गांधींच्या पुतळ्यास हार घालणे कुठे गोरगरिबांना,दीनदुबळ्यांना कशाना कशाचे तरी वाटप करणे वगैरे वगैरे नेहमीचे प्रकार चालूच होते.ते ह्या पुढेही,अन त्या पुढेही म्हणजे अगदी गांधीजी जो पर्यंत आपल्या नोटेवर आहेत तो पर्यंत चालूच राहणार आहेत हे सांगणे नको.

बुधवार, २९ सप्टेंबर, २०१०

रामभाऊचे हॉटेलिंग

अजून कोणी येतंय का?हा वेटरचा प्रश्न अपेक्षितच होता नि त्याला कारण हि तसेच होते कारण कोठल्याही  चांगल्या व्हेज हॉटेल मध्ये पहिल्या मजल्या वरील फॅमिली  रूम मध्ये फक्त २ तरुणच बसले असतील तर त्यांच्या बरोबरच्या लेडीज मागे आहेत नि हे त्यांची वाट पाहत आहेत असेच वाटते.नि पुढे येऊन ह्या दोघांनी जागा मिळवायची व्यवस्था केली आहे असेच वेटरचे हि मत झाले नाही तरच नवल.त्या मुळे आम्ही स्थानापन्न झाल्यावर सुमारे ५ मिनिटांनी वेटरने आम्हास हा प्रश्न केला.उत्तर "नाही" असेच होते ते द्यायची जबाबदारी मात्र रामभाऊनि  घेतली कारण त्यांनीच मला येथवर आणले होते.

बुधवार, १५ सप्टेंबर, २०१०

प्रणम्य शिरसा देवं ! गौरी पुत्रं विनायकम !!

एकदंताय विद्महे ! वक्रतुंडाय धीमही !!

ऐसा गणेश मंगलमूर्ती !
तो म्या स्तविला यथामती !
वांच्छा धरुनी चित्ती ! 
परमार्थाची ! 
ध्यान गणेशाचे वर्णिता !
मतिप्रकाश होय भ्रांता !
गुणानुवाद श्रवण करीता !
बोले सरस्वती !!
समर्थ रामदास स्वामी 
 

आमच्या घरचा यंदाचा गणेशोत्सव २०१०

ओमकार स्वरूपा सदगुरु समर्था!अनाथांच्या नाथा तुज नमो!!  

भव्यरूप वितंड !
भीम मूर्ती महा प्रचंड !
विस्तीर्ण मस्तकी उदंड !
सिंधूर चर्चिला !!
नाना सुगंध परिमळे !
धबधबा गळती गंडस्थळे !
तेथे आली षटपद कुळे !
झुन्कारशब्दे !!
समर्थ रामदास स्वामी   

मोरया,मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे

यंदा माझ्या घरात विराजमान झालेले गणपती बाप्पा 


नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे !
अत्यंत ते साजिरे !
माथा शेंदूर पाझरे वरि बरे  !
दुर्वांकुराचे तुरे !
माझे चित्त विरे मनोरथ पुरे !
देखोनी चिंता हरे !
गोसावीसुत वासुदेव कवि रे !
त्या मोरयाला स्मरे !

गजानना श्री गणराया !आधी वंदू तुज मोरया !!

ह्या वर्षीचा माझ्या घरचा गणेशोत्सव.  २०१० 

वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समःप्रभ !निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा!

माझा गणेश उत्सव २०१०

मंगलमूर्ती मोरया


माझ्या घरचा गणेशोत्सव २०१०

शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०

गणेशोत्सव २००९


प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकम!भक्तावासं स्मरे नित्यं ,मायुः कामार्थ सिद्धये!!
माझ्या घरातील गणेश उत्सव २००९

गणपती बाप्पा मोरया २००८

                                             
  
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समःप्रभ!
निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा!!



प्रारंभी विनंती करू गणपती !
विद्यादयासागरा !
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मति दे !
आराध्य मोरेश्वरा !!
चिंता,क्लेश,दारिद्र्य,दुःख अवघे ! 
देशांतरा पाठवी !
हेरंबा गणनायका गजमुखा !
भक्ता बहु तोषवी !! 

गणेश चतुर्थी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा.

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०१०

ईद मुबारक

"सर्व धर्म समभाव"
श्री.आदमभाई शेखचाचा,जावेदभाई,शाहीदभाई,शोएब,शब्बीरभाई तांबोळी आणि कुटुंबीय,रमजान ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवाना हार्दिक शुभेच्छा.
ईद मुबारक हो!

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०

"सहस्त्रबुद्धे" नि "पोलीस"


एका रविवारी मी सकाळी-सकाळी मित्रा बरोबर खरेदी साठी तुळशीबागे जवळ गेलो होतो.सकाळ असूनही मंडईचा परिसर असल्याने गर्दी हि होतीच.मित्रं काही एक खरेदी साठी दुकानात गेल्याने नि दुकानात गर्दी असल्याने मी बाहेरच उभा राहून गर्दीचे निरीक्षण करू लागलो.तेवढ्यात एक गोरेगोमटे गृहस्थ आपल्या बायकोला स्कूटर वर घेऊन त्या दुकाना समोर येऊन थांबले.नुकतीच मंडई केली असल्याने(बहुदा आठवड्याची)स्कूटर पिशव्यांनी गच्च भरल्या सारखी दिसत होती.गृहस्थ गाडी वरून खाली न उतरता बायकोला थोडे दरडावण्याच्या सुरातच"लौकर ये"असा दम देऊन तिथेच थांबले.'नो पार्किंगचा'बोर्ड असल्याने त्यांनी गाडी वरून उतरणे नि गाडी पार्क करणे हुशारीने टाळले नि ते पण माझ्या प्रमाणेच प्रेक्षकांच्या गर्दीत मिसळले.

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा

सर्व वाचकांना,१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.

रविवार, १ ऑगस्ट, २०१०

सुदाम्याचे पोहे

मित्रांनो,
आज फ्रेंडशिप डे.म्हणजेच आपल्या भगवान कृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीची आठवण करून देणारा.त्या आदर्श आणि अतूट मैत्रीची स्मृती चाळवणारा.काय गम्मत आहे बघा आजच्या ह्या दिवशी ह्या दोघांची आणि त्यांच्या मैत्रीची किती जणांना आठवण झाली असेल ते त्या भगवान कृष्णालाच ठाऊक.

 बदलते पुणे नि पुण्यातील बदल 

मित्रांनो,        
आजचा सकाळ वाचला.कु.दर्शना तोंगारेच्या खुनाची बातमी वाचली आणि मन सुन्न झालं.अहो ह्या आमच्या पुण्याला झालाय तरी काय आणि त्यात चाललाय तरी काय ?एक जेमतेम २२ वर्षाची तरुणी,आपलं शिक्षण पूर्ण करून नुकतीच  नोकरीला  लागती  काय,संध्याकाळी  कामावरून  घराजवळ  येते काय आणि घराजवळ तिच्यावर जीवघेणा हल्ला होऊन त्यात तिचा बळी जातो काय,सगळेच अविश्वसनीय. 
गेल्या  काही  वर्षांपासून जसे पुण्याचे भौगोलिक,सामाजिक  आणि आर्थिकदृष्ट्या रूप पालटत गेले तसे सगळेच बदलले.मुळचे पुणेकर इथे अल्पसंख्य झाले आणि बाहेरून आलेले मग ते कुठून का असेना, पुणेकर म्हणून  मिरवायला लागले.भले पूर्वी पेन्शनरांचे शहर म्हणून पुण्याला ओळखायचे पण पुण्याला निदान काही एक शिस्त होती, एक संस्कृती होती ती आता लयाला गेलीय आणि हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. पूर्वी पोलिसाचा लहानांना नव्हे तर मोठ्यांनाही धाक होता,चौकात लाल दिवा दिसल्यावर सायकलवाला सुद्धा शिस्त म्हणून थांबायचा,कारवाला त्याचा स्वतःचा आब राखून शहरामधून कार चालवतांना डाव्या बाजूने ओव्हरटेक कधीच करायचा नाही,ह्या छोट्या गर्दीच्या रस्त्यावर सायकलवाला, स्कूटरवाला आपल्याला ओव्हरटेक  करणार हे गृहीत धरायचा.मुळात त्याची नुसती गाडी मोठी नसायची तर मन हि मोठे असायचे.नंतरच्या काळात कोणतीही  गाडी ,रस्त्याच्या कोणत्याही भागातून डावीकडून, मधून, उजवीकडून, कुठूनही चालायला लागली.शहराच्या मध्यवस्तीतले रस्ते,अहो रस्ते कुठले बोळ म्हणा बोळ,पण ते ही  एकेरी बनले.रस्त्यांनी  जाताना  पायी  चालणाऱ्यांचा जीव त्यांच्या मुठीत आला.एकेरी वाहतुकीमुळे रस्ते वेगवान झाले,वाहने वाढली,गाड्या वाढल्या,गाड्यांचे आकारमान वाढले पण आता, आत बसलेल्याची मन खूप छोटी झाली.पूर्वी सायकलला सुध्धा गाडी म्हणायचे,नंतर त्याची जागा स्कूटर ने घेतली पण आता छोट्या चारचाकीवाल्याला सुध्धा इज्जत राहिली नाही.पूर्वी शेजारी-पाजारी, नात्यात गोत्यात कोणी गाडी घेतली तर खरोखरचे मनापासून कौतुक व्हायचे.आता एसेमएस चा जमाना  आला,कौतुकाचा भडीमार होतो पण आतून जळजळ वाढली.भला उसकी कमीज मेरे कमीज से ज्यादा सफेद कैसीच्या जाहिराती पॉप्युलर झाल्या. असो .लिहिण्यास काही कमी नाही,सांगण्या सारखे खूप काही आहे वाचणारे आणि त्या वर विचार करणारे तुमच्या सारखे आहेत पण एवढे असून सुद्धा परिस्थिती काही अगदीच वाईट नक्कीच नाहीये.तरुण पिढी नक्कीच आशादाई आहे.ह्यातून ही नक्कीच मार्ग निघेल असा भरंवसा आहे .मला  तर होप्स आहेत तुम्हाला काय वाटतंय?
                                                                              

शनिवार, ३१ जुलै, २०१०

पुणेकर, पण चिंता मात्र मुंबईच्या झालेल्या चिवड्याची

मित्रांनो,         
मराठी ब्लॉग रायटर म्हणून हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी मला थोड सांभाळून घ्याल अशी खात्री आहे.         
आज दिवसभर सुध्धा पुन्हा गेल्या काही दिवसांपासून दळत असलेले पीठच पुन्हा हिंदी च्यानल वाल्यांनी दळायला घेतल होत,ते म्हणजे मुंबईचा पाऊस. अहो कंटाळा आला हो.मुळातच मुंबई हि समुद्र सपाटीला वसलेली आहे.आता सध्या आपण  सगळे ज्याला मुंबई,मुंबई म्हणतो 'त्या 'मुंबईचा बराचसा सध्याचा भाग हा आता  मातीचे भाराव टाकूनच बनविण्यात आलेला आहे.मुळात इंग्रज जेव्हा भारतावर राज्य करीत होते तेव्हाची मुंबई हि बेटांची मुंबई होती.समुद्र सपाटी लगत असलेली पण तुलनेने खूप जवळ जवळ असलेली बेटे मिळून तेव्हाची मुंबई बनलेली होती.पण गेल्या  काही  वर्षात आपली सगळीच समीकरणे बदलली आणि बिचारी मुंबई सुद्धा त्या मुळे बदलली.नव्हे आपण तिला बदलली.संपूर्ण देश भरातून गेल्या ५० वर्षात इतके लोक मुंबईत पोटार्थी म्हणून/बनून वेगवेगळ्या निमित्ताने येऊन तथा  कथित मुंबईकर झाले.झाले नव्हे बळच बनले.बिचारी मुंबई,काय करणार?घेतलन  काय तिन  सगळ्यांना सामावून आणि सांभाळून.    पण आपण त्या पुढचे  निघालो.आपण काय केल? तिनं आपल्याला बोट दिल,आपण हात धरला ,आणि बिचारी काही कुरकुरत नाही म्हटल्यावर तो पार खांद्या पासूनच उखडला.म्हणजे खरोखरचे जिथ पर्यंत राहण्या योग्य जागा होती( खर तर ती तेव्हा   सुद्धा फारशी नव्हतीच ) तिथ पर्यंत बांधकामे होत गेली,पण लोकांचे लोंढे काही केल्या थांबेनात,मग पूर्वी जिथे खाड्या होत्या तिथे ह्या नवीन आलेल्या मंडळीनी मातीचे कचऱ्याचे भराव टाकून त्या वर त्यांची बांधकामे करायला सुरुवात केली.पूर्वी बेटांची असलेली मुंबई हळू हळू एकसंध होत गेली .पण फक्त भौगोलिक दृष्ट्या.माणसे  मात्र  एकमेकां पासून दूर होत गेली
अहो जी मुळात जमीनच  नव्हती तिथे आपण भराव टाकून तिला जमीन बनवली. फक्त  आपल्या  स्वार्थापोटी, गरजेपोटी आणि आता आपणच बोंब मारून उठतो  कि,दरवर्षी पावसाळ्यात इथ पूर येतो नि पाणी साचत!अरे  लेको  तिथ  तेच होणार.मुळात तिथे भौगोलिकदृष्ट्या  जमीनच नाहीये,त्या मुळे, मुळात ती माणसाला राहण्यायोग्य जागाच नाहीये.ती पूर्वीची खाडी आहे,आता लेको तिथ भराव करून तुम्ही रहाताय हा काही मुंबईचा किंवा त्या समुद्राचा दोष नाहीये.     आता गेल्या  काही वर्षात  हे  केबल टीव्हीचे राज्य आणि विशेष करून ह्या हिंदी चानल वाल्यांची चलती झाल्या पासून ते ह्या गोष्टीला अवास्तव  महत्व,नव्हे फुटेज द्यायला लागले म्हणून तुमचे फावले काय? खरतरं  त्यांनी  इथे पाणी ह्या-ह्या लोकांनीच केलेल्या  भौगोलिक बदला मुळेच साचते आहे हे जगाला ओरडून सांगायला पाहिजे.पण ते सांगणार नाहीत कारण दरवर्षीच्या पावसाळ्यातला,ह्याला बातमी म्हणून दाखविणे  हा त्यांचा हुकमी एक्का आहे ना ते तो कसा वाया घालवतील? महानगरपालिकेच्या नावाने बोंब मारायला मिळून आपण खूप मोठे समाज कार्य करीत आहोत, लोकसेवा  करीत आहोत हे मिरवायला ते  कसे  विसरतील? सगळे सारे ४२०.          
असो,आपण आपल्याला विनाकारण त्रास करून घ्यायचा नाही.नेहमी प्रमाणे उगी राहायचं .माझं जाऊन द्या हो पण तुम्हाला काय वाटतंय?